Home महाराष्ट्र औरंगाबाद मराठा आरक्षण, जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदेंच्या भावाला नोकरी दिली, पण पगार…

मराठा आरक्षण, जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदेंच्या भावाला नोकरी दिली, पण पगार…

0

प्राईम नेटवर्क : राज्यात मराठा आंदोलना दरम्यान औरंगाबाद मध्ये जलसमाधी घ्यायला निघालेल्या काका साहेब शिंदे यांचा अपघाता दरम्यान बुडून मृत्यू झाला. यावेळी काकासाहेब यांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. काकासाहेब शिंदे यांचा भाऊ अविनाश आला शिक्षकेतर पदावर लोपीक म्हणून नोकरी देण्यात आली आहे.

मात्र त्यांच्या नियुक्ती पत्रात पुढील ३ वर्षांसाठी २ हजार रुपये मानधन देण्याचं सांगण्यात आलं आहे. ३ वर्षांनंतर त्यांना सातव्या वेतन आयोगा नुसार वेतन देणार असल्याचं नियुक्ती पत्रात म्हटलं गेलं आहे.

दरम्यान आमदार सतीश चव्हाण, यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या गंगापूर न्यू हायस्कुल ७ ऑगस्ट २०१८ ला नोकरी मिळवून दिली. मात्र अविनाश शिंदे यांना फक्त २ हजार रुपयांचे मानधन मिळत असल्याची बाब समोर आली. नियुक्ती पत्रात तसा स्पष्ट उल्लेख केल्याने, त्यांना ३ वर्ष २ हजारां मध्येच नोकरी करावी लागणार आहे.