Home महाराष्ट्र शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले: उद्धव ठाकरेंना ‘हे’ मानाचं पद द्या; आणि सत्तास्थापनेवरही...

शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले: उद्धव ठाकरेंना ‘हे’ मानाचं पद द्या; आणि सत्तास्थापनेवरही झाली चर्चा!

0

मागली काही दिवसांपासून भाजप शिवसेना यांच्यात कुठली चर्चा अथवा बैठक पाहायला मिळत नव्हती. मात्र आता हमरी तुमरी सोडवून शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील ओल्या दुष्काळाबाबत चर्चेसाठी ही बैठक घेण्यात आली. या दरम्यान सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे ६ मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत सत्तास्थापने बद्दलही चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

मीडिया न्यूज नुसार शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिवसेना-भाजपा यांच्यातील सत्तास्थापनेवर व मंत्रिपदाच्या वाटपाबाबत चर्चा केली. सोबतच राज्य सरकारमध्ये एक सुकाणू समिती असावी व त्यांचे अध्यक्ष उद्धव ठाकरे असावेत, असा एक प्रस्ताव मांडल्याचं सांगण्यात येत आहे. अर्थात यात काही अटीही आहेतच, पण एकंदरीत शिवसेना पाठिंबा देण्याच्या मनःस्थितीत असल्याचं चित्र दिसत आहे. परिणामी सत्ता स्थापनेचा तिढा सुटला अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

मुख्यमंत्रिपद वगळता इतर सर्व महत्वाची खाती समसमान देण्यासाठी भाजपा तयार असल्याने शिवसेनाही आपला मुख्यमंत्रिपदाचा हट्ट सोडून सत्तेत सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.