Home महाराष्ट्र “भरवसा नसेल तर सेक्युरिटी कव्हर सोडून द्या”; वरुण सरदेसाईंचे अमृता फडणवीसांना उत्तर

“भरवसा नसेल तर सेक्युरिटी कव्हर सोडून द्या”; वरुण सरदेसाईंचे अमृता फडणवीसांना उत्तर

0

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येप्रकरणी ट्विट करून आपले मत मांडले. त्यात त्या म्हणाल्या की, “ज्या पद्धतीने सुशांत सिंग राजपुतची केस हाताळली जात आहे, त्यावरून मला असे वाटते की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निष्पाप, सज्जन व स्वाभिमानी नागरिकांना राहण्यासाठी मुंबई सुरक्षित राहिलेली नाही.” या ट्विटमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांचा कुठेही उल्लेख केला नव्हता. परंतु या त्यांच्या ट्विटवरून त्या बऱ्याच चर्चेत आल्या आहेत.

अमृता फडणवीस यांचे ट्विट पुढीलप्रमाणे:

युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, “मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर !!” अशा परखड शब्दांत त्यांनी अमृता फडणवीसांना उत्तर दिले.

वरुण सरदेसाई यांचे ट्विट पुढीलप्रमाणे: