Home महाराष्ट्र मी तुम्हाला शपथविधी सोहळ्यात स्टेजवर उभे करतो: ‘या’ दाम्पत्याला उद्धव ठाकरे यांचा...

मी तुम्हाला शपथविधी सोहळ्यात स्टेजवर उभे करतो: ‘या’ दाम्पत्याला उद्धव ठाकरे यांचा शब्द

0

काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे द्यायला होकार दर्शविला आहे. त्यामुळे लवकरच सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे व उद्धव ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार अशी चिन्ह आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या सांगली दौऱ्यात काल एक भावूक प्रसंग घडला; ज्याची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होत आहे. सांगलीतील संजय सावंत आणि रुपाली सावंत हे दाम्पत्य शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून निरंकार उपवास करत ८५ किलोमीटर अनवाणी पायाने चालत पंढरपूरला गेले होते. या दाम्पत्याची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांनी आभार व्यक्त केले व शेतकऱ्याच्या हितासाठी हवं ते करणार असे आश्वासन केले.

मीडिया रिपोर्टनुसार या भेटीच्या वेळी सांगलीतील संजय सावंत आणि रुपाली सावंत या दाम्पत्याने “शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना स्टेजसमोर मला जवळ उभं करा” अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर “तुमचा संपर्क क्रमांक द्या, मी तुम्हाला शपथविधी सोहळ्यात स्टेजवर उभे करतो” असा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला.