
महाराष्ट्रातील एकंदर परिस्थिती बघता लॉकडाउन हा ३१ मे पर्यंत ढकलण्याची तयारी राज्य सरकार करत आहे अशी माहिती झी न्युज मीडिया ने दिली असून पुढील निर्णय हे राज्यसरकार २ दिवसात जाहीर करणार असल्याचे समजते.
मागील दोन दिवसांपासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील मंत्र्यांची आढावा बैठक सुरू होती, यामध्ये कोरोणाची राज्यातील स्तिथीचा आढावा घेण्यात आला, सोबतचं लॉकडाऊन ३१ मे पर्यन्त वाढवण्याबद्दल विचार विनिमय झाला.
राज्यातील हे पुढचे लॉकडाउन अर्थव्यवस्थेला पूरक असल्याचे बोलले जात आहे, म्हणजेच या लॉकडाउन मध्ये आता काही उद्योगधंद्यांना सशर्त परवानगी देण्यात येणार असून. त्यामुळे लोकांना रोजगार मिळण्याची आशा आहे.
दरम्यान भारतीय रेल्वे ने ३० जून पर्यंतचे सर्व आरक्षित तिकिटे रद्द केली असून, निदान ३० जून पर्यंत तरी कुठलीच पॅसेंजर सेवा देण्यात येणार नसल्याचे रेल्वे कडून कळतं आहे. लॉकडाउन काळामध्ये ज्यांनी ज्यांनी जून पर्यंत आरक्षित तिकीटे काढली त्या सर्वांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.