Home महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये लॉकडाउन कमीत कमी ३० एप्रिलपर्यंत कायम राहील : उद्धव ठाकरे

महाराष्ट्रामध्ये लॉकडाउन कमीत कमी ३० एप्रिलपर्यंत कायम राहील : उद्धव ठाकरे

0

आज दुपारी पंतप्रधान मोदी आणि देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स झाली यामध्ये केंद्र सरकारने राज्यांच्या परिस्तिथीचा आढावा घेत लॉकडाऊन संबंधी पुढील वाटचालींबद्दल निर्देश दिले. 
याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी सोशल मीडिया वर लाइव्ह येत जनतेशी संवाद साधला. ” आज मा. पंतप्रधानांशी लोकडाऊनच्या पुढील वाटचाली संबंधात सर्व मुख्यमंत्री मिळून एक चर्चा झाली. याचं चर्चेतून लॉकडाऊन अजून पुढे ढकलण्याची गरज असल्याचे निष्पन्न झाले. महाराष्ट्रातील रुग्णांचा आकडा हा सतत वाढता असल्यामुळे आपण हे काही लॉकडाऊन आहे ते किमान ३० एप्रिल पर्यंत वाढवत आहोत.” असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

“महाराष्ट्रातील परिस्तिथी किंबहुना सबंध देशातीलच परिस्तिथी गंभीर आहे. जो तो फक्त १४ एप्रिल नंतर काय याचा विचार करत असतो आणि त्यातच रुग्णांच्या वाढत्या संख्येने मनस्तिथी सुद्धा बिघडत आहे.पण आपण नक्कीच कोरोना सोबतचे युद्ध हे जिंकणार आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हे शक्य होणार आहे. देशामधील सर्वच राज्यांची सरकारे राजकारण बाजूला सारून एकजुटीने कोरोना विरुद्ध लढत आहेत. आपली अशी एकजूट कायम राहिली तर कोरोना तर सोडाच कुठलेही संकट आपलं काही एक वाकडं करणार नाही” असा आशावाद मा. मुख्यमंत्र्यांनी केला.


” मी लॉकडाउन किमान ३१ तारखे पर्यंत वाढवत आहे या वाक्यातील किमान शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तरचं आपण ३१ तारखेपर्यंत लढाईचा मोठा भाग आपण जवळ जवळ जिंकला असेल!” असे भाष्य करत मुख्यमंत्र्यांनी ३१ एप्रिल ला लॉकडाऊन संपुष्टात येईलच असे नाही हा संकेत दिला आहे.