Home महाराष्ट्र “१४ एप्रिल नंतर टप्याटप्याने लॉकडाउन कमी करणार”- उद्धव ठाकरे

“१४ एप्रिल नंतर टप्याटप्याने लॉकडाउन कमी करणार”- उद्धव ठाकरे

0

उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झालेल्या बैठकीमधील महत्वाचे विषय व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सांगितले, “मी सर्व धर्माच्या प्रमुख गुरू आणि सर्व धार्मिक नेत्यांना विनंती करतो की कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. तसेच सामाजिक अंतर पाळले जाईल, असे आवाहन करणे खूप गरजेचे आहे!”.

या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील धार्मिक गुरूंशी तातडीने संपर्क साधून तळागाळापर्यंत आवाहन करावे, असे सांगितले.लॉकडाऊनच्या काळात नागरिकांचे मानसिक आरोग्य चांगले असण्यासंदर्भात मुख्यमंत्री या कॉन्फरन्समध्ये बोलले होते, त्यालाही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर नेमके कशा पध्दतीने राज्य सरकारांनी परिस्थिती ठेवावी याविषयीही मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मार्गदर्शन मागितले आहे. यावर पंतप्रधानांनी राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन संपवू नये तर राज्यातील स्थितीनुसार टप्य्याटप्य्याने याचे नियोजन करा व कुठेही एकदम गर्दीचे लोंढे बाहेर दिसतील व सर्व काही व्यवस्थित सुरू झाले आहे, असे समजून लोक रस्त्यावर येतील असे अजिबात न होऊ देण्याच्या सूचना केल्या आहेत.