Home महाराष्ट्र महाविकास आघाडी आज विधानसभेत संख्याबळ सिद्ध करणार….

महाविकास आघाडी आज विधानसभेत संख्याबळ सिद्ध करणार….

0

महाराष्ट्रातील राजकीय हालचाली एकदाच्या स्थिरावल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापित झाले आहे. या सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज दिनांक ३० नोव्हेंबरला विधानसभेत मांडला जाणार आहे. पुरेसे सत्ताबळ नसल्याने देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून स्थापन केलेले सरकार अवघ्या ३ दिवसांत कोसळले. मात्र संख्याबळ असल्याचा दावा केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार राज्यपालांनी मान्य केले. हेच संख्याबळ सिद्ध करण्याची वेळ आता महाविकास आघाडीवर आली आहे. त्यासाठीचा विश्वासदर्शक ठराव आज दुपारी दोन वाजता विधानसभेत सादर करण्यात येणार आहे.

हा ठराव मांडण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सुनील प्रभू, काँग्रेसच्या वतीने अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवाब मलिक या नेत्यांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच विधानसभा अध्यक्षांची तसेच विरोधीपक्षनेत्याची देखील आज निवड होईल असे मीडिया न्यूजवरून समजले.