Home महाराष्ट्र यूपीएससीच्या परिक्षार्थींसाठी अनेक जिल्ह्यांमध्ये महामंडळातर्फे विशेष बसेसचे आयोजन!

यूपीएससीच्या परिक्षार्थींसाठी अनेक जिल्ह्यांमध्ये महामंडळातर्फे विशेष बसेसचे आयोजन!

0

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीची नागरी पूर्वपरीक्षा ३१ मे २०२० ला होणार होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कारणास्तव सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता या परीक्षा ४ ऑक्टोबरला दोन सत्रांत होणार आहेत. ही परीक्षा देणार असलेल्या उमेदवारांची लॉकडाऊनमुळे गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने विशेष बसेसचे आयोजन केले आहे.

महाराष्ट्रात या परीक्षेची महत्वाची केंद्रे असलेल्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक येथून या बसेस सोडल्या जाणार आहेत. याशिवायही इतर ३८ शहरांमधील केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. या इतर शहरांतून मागणी झाल्यास तेथेही या बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जातील असे मीडिया न्यूजमधून सांगण्यात येत आहे. मात्र त्यासाठी किमान ४० प्रवासी असणे आवश्यक असेल.