Home महाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर आता दहावीचा कधी लागणार जाणून घ्या

बारावीचा निकाल जाहीर आता दहावीचा कधी लागणार जाणून घ्या

0

आज दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला, दरवर्षी प्रमाणे निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून उत्तीर्ण होणाऱ्यांच्या संख्येत मुलींची संख्या जास्त आहे. अनेक दिवस प्रतीक्षा केल्यानंतर निकालामुळे १२वीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता बारावी नंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची चाहूल लागली आहे.

वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते त्याप्रमाणे १५ जुलै पर्यंत बारावीचा तर जुलै शेवटी दहावीचा निकाल लावण्यात येईल असे म्हटले आहे. या नुसार दहावीचा निकाल हा जुलै च्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात लागू शकतो.

दहावी बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी Tv9मराठी ला सांगितल्या प्रमाणे दहावीचा निकाल लावणे हे विलक्षण अवघड काम होते, ” परीक्षा सुरू असतानाच लॉकडाऊन सुरू झाले आणि विद्यार्थ्यांचे सर्व पेपर हे त्या त्या गावात अडकून राहिले. या सर्व पेपरला जमा करून प्रत्येक शिक्षकाकडे पोहचवणे, त्यांच्या कडून हे वेळेमध्ये तपासून घेणे आणि बोर्डात परत आणणे हे लॉकडाऊन मुळे ताराच्या कसरती सारखे होते. एव्हाना कोरोनाच्या रेड झोन मधून सुद्धा पेपर जमा करावे लागले. या सर्व गोष्टीनंतर सुद्धा आम्ही हे काम बजावले असून आता निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे, लवकरच आम्ही निकालाची घोषणा करू”