
कोरोना विषाणूच्या प्रभावाने बरेच दिवस लांबणीवर पडलेला बारावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली असून बोर्डाने उद्या दुपारी निकाल जाहीर केला जाईल असे म्हटले आहे, याबाबतीत त्यांनी वेबसाईट जरी केली असून त्याद्वारे हा निकाल पाहता येणार आहे.
कसा पाहता येईल निकाल?
तुम्हाला खाली दिलेल्या दोनपैकी एका कुठल्याही संकेतस्थळ द्वारे आपला निकाल बघता येईल
http://www.hscresult.mkcl.org/
कसे बघाल गुणपत्रक?
(१) संकेतस्थळ भेट करून तिथे बारावी निकालावर क्लिक करा
(२) त्यानंतर तिथे आपला रोल नंबर टाकून हॉल तिकीटनुसार आईचे नाव टाकावे
(३) तुमचा निकाल तुम्हाला दिसू लागेल या नंतर तुम्ही हा निकाल प्रिंट करू शकता.
तुमच्याकडे इंटरनेट नसेल तर काय कराल?
इंटरनेट सुविधा नसेल तर SMS च्या माध्यमातून सुद्धा निकाल बघता येईल त्यासाठी तुम्हाला
57766 या क्रमांकावर
MH HSC <तुमचा रोल नंबर>
असा SMS केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल कळू शकेल
संकेतस्थळ भेट देऊन निकाल बघताना आपला निकाल बरोबर आहे का त्यामध्ये काही तफावत असल्यास घाबरून न जाता बोर्डाने दिलेल्या नियमांचे पालन करा , तुम्हाला तुमच्या उत्तरपत्रिका ह्या बोर्डाला विनंती करून पाहता येऊ शकतात त्यामुळे कुठल्याही तणावात जाऊ नका.
इतर कुठल्याही ठिकाणांवरून वरील दिलेल्या संकेतस्थळ पेक्ष्या दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळ भेट देणे टाळा, लोक तुमच्या निकाल बघण्याच्या अतुरतेचा गैरफायदा घेत जाली आणि बनावट संकेतस्थळ प्रसारित करत आहेत. उदाहरणार्थ खाली दिलेले हे संकेतस्थळ बनावट आहे
http://results.maharashtraeducation.com/