Home आरोग्य संपूर्ण महाराष्ट्र नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा

संपूर्ण महाराष्ट्र नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा

0

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या ७ महिन्यांपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. राज्यातील एक एक गोष्ट हळूहळू अनलॉक होत असली तरी अजूनही पूर्णपणे सर्व गोष्टी चालू झालेल्या नाहीत. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतांना दिसून येत आहे. दिवसेंदिवस राज्याची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. ही बाब विचारात घेऊन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की यापुढे लॉकडाऊन असणार नाही.

लोकसत्ताच्या मीडिया रिपोर्टनुसार राजेश टोपे म्हणाले, ” राज्यात आता लॉकडाऊन वाढवले जाणार नसून नोव्हेंबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण अनलॉक होईल.” अहमदनगरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत असताना टोपेंनी असे वक्तव्य केले. त्यामुळे आता पुढे काय होते यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.