Home महाराष्ट्र शिवाजी महाराजांना वंदन करून महाविकास आघाडीचा पहिला वहिला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात

शिवाजी महाराजांना वंदन करून महाविकास आघाडीचा पहिला वहिला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात

0

आज महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला वहिला अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सुरू झाला. ठाकरे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत हा अर्थसंकल्प मांडत आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला असून सगळ्या राज्यातील जनतेचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागत असताना एक एक घोषणा समोर येत आहे.

आत्तापर्यंत जाहिर झालेल्या महत्वाच्या घोषणा:
(१)प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलीस ठाणे

(२) राज्यातील ८०% नोकऱ्या ह्या स्थानिकांना देण्यासाठी कायदा

(३) कर्जमाफीसाठी २२हजार करोड रुपयांचा निधी मंजूर, 

(४) कर्जमाफीच्या बाकी असलेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना खरीप हंगामा अगोदर कर्जमाफी होणार.

(५)गोड्या पाण्याच्या मासेमारीला प्रोत्साहन 

(६) २०३०-२१ मध्ये २ लाख रोजगार निर्मिती करणार

(७) मराठवाडा वॉटरग्रीड साठी २०० कोटी

(८) राज्य परिवहनच्या बसेस बदलून वायफाय असलेल्या बससेवा सुरू करणार