Home महाराष्ट्र महाराष्ट्रीयन “नसलेल्या” तरुणांना प्राधान्य दिले जाईल : नोकरीच्या या जाहिरातीवर मनसेने घेतला...

महाराष्ट्रीयन “नसलेल्या” तरुणांना प्राधान्य दिले जाईल : नोकरीच्या या जाहिरातीवर मनसेने घेतला आक्षेप, आणि…

0

काही दिवसांपूर्वी बेलापूर येथील एका कंपनीने कर्मचारी भरतीसाठी जाहिरात दिली होती व जाहिरातीत स्पष्ट केले होते की, ‘महाराष्ट्रीयन तरुणांना इथे नोकरी मिळणार नाही’. या बातमीने संतप्त होऊन मनसे अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला व जाहिरात मागे घेण्यास सांगितले. त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापकांनी माफीनामा लिहून दिला व जाहिरात मागे घेतली.

सकाळच्या एका मीडिया न्यूजनुसार बेलापूर सेक्टर ११ येथील ‘सेफ सेस’ या जलवाहतूक करणाऱ्या कंपनीने कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. वर्तमानपत्रात छापून येण्याआधी ही जाहिरात सोशल मीडियावर प्रसारित झाली होती. या जाहिरातीत ‘महाराष्ट्रीयन नसलेल्या तरुणांना प्राधान्य दिले जाईल’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. या जाहिरातीमुळे ‘महाराष्ट्रात कंपनी असून महाराष्ट्राच्या तरुणांना प्राधान्य न देणाऱ्या’ या कंपनीचा मुंबईतील नागरिकांनी तसेच राजकीय पक्षांनी निषेध व्यक्त केला. मिळालेल्या अधिक माहितीनुसार मनसेचे नवी मुंबई प्रदेशाध्यक्ष गजानन काळे यांनी या घटनेचा जाब विचारण्यासाठी काही कार्यकर्त्यांना सदर कंपनीच्या कार्यालयात पाठवले. कार्यकर्त्यांचा रोष पाहून कंपनीने पडती भूमिका घेतली व मनसेच्या नावे माफीनामा सादर केला तसेच यापुढे मराठी तरुणांना नोकरीसाठी प्राधान्य दिले जाईल असेही सांगितले.