Home महाराष्ट्र मराठा आरक्षण प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मराठा आरक्षण प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

0

मराठा आरक्षण प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. मराठा आरक्षण वैध ठरवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील अपिलांवर आज अर्थात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या निकालाकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष असून नवनियुक्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. अशी माहिती मिळत आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार राज्य सरकारने मराठा समाजाला कायद्याद्वारे दिलेले आरक्षणाचे १६ टक्क्यांचे प्रमाण १२-१३ टक्के कमी करून तो वैध ठरवणारा निर्णय उच्च न्यायालयाने २७ जूनला दिला. त्याविरोधात जयश्री पाटील यांच्यासह अन्य अनेक विरोधी जनहित याचिकादारांनी लगेचच सर्वोच्च न्यायालयात अपील केले. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. व सबंध महाराष्ट्राचे लक्ष या निकालावर राहील.