Home महाराष्ट्र चर्चेला उधाण: अपक्ष आमदार बच्चू कडुंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट.

चर्चेला उधाण: अपक्ष आमदार बच्चू कडुंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट.

0

जसं निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालं तसे राजकीय पक्ष आणि नेते मंडळींमध्ये अगदी वीज संचारली आहे. हालचाली गतिमान झाल्या आहेत. चहूकडे विधानसभेची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. अशात अचलपूर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे सबंध महाराष्ट्रात चर्चेला उधाण आलं आहे. मीडिया रिपोर्ट नुसार त्यांची मातोश्रीवर बराच वेळ चर्चा चालू होती. त्यामुळे बच्चू कडू शिवबंधनात एकरूप होणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात पसरत आहे.

या संदर्भात बच्चू कडूंनी स्वतः कुठल्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. ते म्हणतात “सध्या माझा कुठल्याही पक्षात जाण्याचा विचार नाही. केवळ ‘प्रहार’ संदर्भात काही गोष्टी बोलण्यासाठी आम्ही भेटलो.” मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये भरती चालू असतांना पुढे काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.