
प्राईम नेटवर्क : लोकसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर मनसे आणि राज ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, मनसेच्या बुडत्या जहाजाला वाचवणारे मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. पदाअधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शरद सोनवणे आज संध्याकाळी मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
आमदार शरद सोनवणे यांना पक्षात घेतल्यास सामूहिक राजीनाम्याची धमकी
मात्र तत्पूर्वी आमदार शरद सोनवणे यांना शिवसेनेत घेण्यास स्थानिक कार्यकर्त्यांचा जोरदार विरोध असल्याची चर्चा आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता आमदार शरद सोनवणे यांना पक्षात घेतल्यास सामूहिक राजीनाम्याची धमकी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज ठाकरे मोदी आणि भाजप वर राग आळवत बसले आणि…
राज ठाकरे मोदी आणि भाजप वर राग आळवत बसले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सुलभ वाटणारी धोरणे आणि टीका केल्याने, वेगळे पडले आहेत, मात्र याच वेळी स्वतःच्या पदाधिकार्यांकडे वेळीच लक्ष न दिल्याने संघटना तुटत जाऊन एक एक मनसैनिक तुटत चालला आहे.