Home महाराष्ट्र मुंबईकरांसाठी खुशखबर! मेट्रो मार्गांसाठी ७६ हजार २९९ कोटींचा निधी मंजूर.

मुंबईकरांसाठी खुशखबर! मेट्रो मार्गांसाठी ७६ हजार २९९ कोटींचा निधी मंजूर.

0

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना खुशखबर मिळाली आहे. एमएमआरडीए अर्थात मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंटने मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी २०२१ पर्यंत पुरेल असा ७६ हजार २९९ कोटींचा निधी मंजूर केला आहे असे मीडिया न्यूजवरून समजले. या निधीतून मेट्रो २ अ अर्थात दहिसर ते डीएन नगर आणि मेट्रो ७ अर्थात दहिसर ईस्ट ते अंधेरी ईस्ट या दोन मार्गांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

मुंबई लोकलमधील अफाट गर्दीमुळे अपघातांचे प्रमाण बरेच वाढले आहे. हे अपघात टाळण्यासाठी एमएमआरडीए कडून मेट्रो मार्ग वाढवण्यासाठी अतोनात प्रयत्न चालू आहेत. प्रगतीपथावर असलेल्या मेट्रो मार्गावरून जवळपास ५० लाख प्रवासी प्रवास करतील ज्यामुळे उपनगरीय रेल्वेतील ३५% गर्दी कमी होईल असा अंदाज बांधण्यात आला आहे. मेट्रो मार्गाच्या सर्व कामांसाठी मोठे संख्याबळ उभारण्यात आले आहे. त्यात ५५० हुन अधिक इंजिनीअर्स, जवळपास १८ हजार कुशल न अकुशल कामगार या सर्वांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे बऱ्याच लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे तसेच तंत्रज्ञान, सिमेंट, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स सारख्या क्षेत्रांना भरपूर फायदा देखील होत आहे.