Home महाराष्ट्र मनसेने सुरु केला माणुसकीचा फ्रिज; जाणून घ्या काय आहे योजना

मनसेने सुरु केला माणुसकीचा फ्रिज; जाणून घ्या काय आहे योजना

0

मुंबईत आजही बरेच लोक बेरोजगारीसारख्या समस्यांमुळे उपाशी झोपतात. या बाबीचा विचार करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘मणिसकीचा फ्रिज’ ही योजना सुरु केली आहे. मनसेने गरिमा फाउंडेशन, आपला माणूस प्रतिष्ठान व NESH या संस्थांसोबत हा उपक्रम चालू करण्यात आला असल्याची माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली आहे. टीव्ही९ मराठीच्या मीडिया रिपोर्टनुसार माहीम येथील शितलादेवी मार्ग परिसरात असलेल्या मनसेच्या कार्यालयात या उपक्रमाचे आज उद्घाटन पार पडले. याशिवाय दादरच्या कार्यालयातही हा उपक्रम सुरु होणार असल्याची माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून मिळाली.

या ट्विटमध्ये नितीन सरदेसाई यांचे ‘कुणीही उपाशीपोटी झोपू नये या प्रामाणिक भावनेने आम्ही एक उपक्रम सुरु करत आहोत’ असे वक्तव्य आहे. हा माणुसकीचा फ्रिज दादर व माहीम येथील मनसे कार्यालयांमध्ये बसवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यात नागरिकांनी आपल्या घरातील अतिरिक्त खाद्यपदार्थ, फळे या फ्रिजमध्ये आणून ठेवावे व जे भुकेले असतील त्यांनी ते घेऊन जावे अशी संकल्पना असल्याचेही नितीन सरदेसाई यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.