Home महाराष्ट्र पालघर मध्ये मूल चोरीच्या संशयावरून जमावाने केली २ साधूंची ठेचून हत्या; ११०...

पालघर मध्ये मूल चोरीच्या संशयावरून जमावाने केली २ साधूंची ठेचून हत्या; ११० आरोपी जेरबंद

0


चोर समजून मारहाण करण्यात आलेल्या तीन प्रवाशांच्या मारहाणीचा व्हीडिओ काल रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. एक ड्रायव्हर आणि दोन साधूंना शंभर एक लोकांनी जीवे मारल्याची घटना काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये घडली होती. पोलीसांनी कारवाई करत याविरोधात गुन्हा दाखल केला.

ज्याप्रकारे या साधूंना अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्याचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर अनेकांनी तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. मॉब लिंचिंगच्या प्रकारावर पुरस्कारवापसी गँगवाले गप्प का?, महाराष्ट्र खरंच सुरक्षित आहे का ?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात हिंदूंची अशीच अवस्था होणार आहे का ?, लॉकडाऊनच्या काळात या ठिकाणी इतका जमाव एकत्र कसा आला?, असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने विचारण्यात येत आहेत. 

पालघर हत्याप्रकरणाबाबत अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडले आहे. त्यांनी रविवारी रात्री ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले. या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हत्या झालेले तिघेजण कांदिवली येथे राहणारे होते. तिघेही मयत हे त्रंबकेश्वरचे दक्षिणमुखी आखाड्याशी संबंधित आहेत. हे तिघे दादरा नगर हवेलीकडे जायला निघाले होते. खरे तर लॉकडाऊन असल्याने रात्री आडरस्त्याने जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. रात्री साडेदहा-अकरा वाजण्याच्या दरम्यान या गावात गस्त घालणाऱ्या गावकऱ्यांनी त्यांची गाडी अडवली आणि हटकले. दरोडेखोर आणि मूलचोर असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी या तिघांना जबर मारहाण केली.