Home महाराष्ट्र मोदींनी कधीच त्यांची जात कोणाला सांगितली नाही : नितीन गडकरी

मोदींनी कधीच त्यांची जात कोणाला सांगितली नाही : नितीन गडकरी

0

विधानसभा निवडणुका तोंडावर असतांना राजकीय रेलचेल जोरदार चालू आहे. अलीकडेच फडणवीसांनी पवारांवर जोरदार टीका केली असून आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी “राजकारणात अनेक लोकं जेव्हा स्वकर्तृत्वावर उमेदवारी मिळवण्यात अपयशी ठरतात तेव्हा ते जातीचं कार्ड समोर करतात”, अशा सणसणीत शब्दांत सडेतोड मत मांडलं आहे. नितीन गडकरी यासंदर्भात नागपूरमध्ये बोलत होते. ही बातमी ABP माझाने दिली.

एवढ्यावरच गडकरी थांबले नसून, “हे लोक राजकारणात महिला आरक्षणाची मागणी करत असतात. इंदिरा गांधी, सुषमा स्वराज, वसुंधरा राजे याही महिलाच आहेत, मात्र त्या आरक्षणामुळे मोठ्या झाल्या नाहीत. त्याचबरोबर राजस्थानात अशोक गहलोत माळी समाजाच्या पाठिंब्याने नाही तर सर्व समाजांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले आहेत” असं देखील म्हणाले आहेत. हे सर्व मतं मांडत असतांना, “मोदींनी कधीच त्यांची जात कोणाला सांगितली नाही” याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.