प्रचारसभेदरम्यान चक्क खासदारावर हल्ला झाल्याने उस्मानाबादसह राज्यभरात या एकच घटनेची चर्चा होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब इथे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर प्रचारसभेदरम्यान गर्दीचा फायदा घेत खुनी हल्ला झाला आहे.
शिवसेननेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरात ही पहिली घटना नाही. स्वतः त्यांच्यावर दिवसा ढवळ्या चाकूहल्ला झालाच मात्र ओमराजे यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची काही वर्षांपूर्वी हत्या झाली होती. मीडिया न्यूज नुसार ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते पद्मसिंह पाटील या दोन घरात टोकाचे वैर आहे.
TV9 च्या रिपोर्ट नुसार प्रचारसभेदरम्यान गर्दीचा फायदा घेत ओमराजे निंबाळकरांवर हल्ला झाला. हात मिळवण्याच्या बहाण्याने हल्लेखोर ओमराजेंजवळ गेला. त्यावेळी त्याने चाकू काढला आणि ओमराजेंवर हल्ला केला. माथेफिरुने खासदार ओमराजेंवर तब्बल तीन वार केले. त्यांच्या हातातील घड्याळावर चाकूचे वार बसले. घड्याळाच्या बाजूला हातावरही वार बसले. वार चुकल्यानंतर माथेफिरु पळून गेला.