Home आरोग्य धक्कादायक बातमी : मुंबईहून १०० कोरोना पॉसिटीव्ह फरार, शोधाशोध सुरू

धक्कादायक बातमी : मुंबईहून १०० कोरोना पॉसिटीव्ह फरार, शोधाशोध सुरू

0

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढतंच आहे, त्यामुळेच कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल २१ हजारांवर गेला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसमोर रुग्णसंख्या कमी करण्याचं मोठं आव्हान आहे. मात्र असं असताना सुद्धा मुंबईमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबईत तब्बल १०० हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे अचानक गायब झाल्यामुळे मोठं संकट उभं ठाकलं आहे. त्यात हे सर्व रुग्ण पॉझिटिव्ह असल्यामुळॆ त्यांच्यामुळे इतरांनाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका आहे. इतक्या मोठ्या मुंबईत या अचानक बेपत्ता झालेल्या कोरोना रुग्णांना शोधून काढणं हे काही सोपं काम नाहीये. त्यामुळे सामान्य मुंबईकरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

हे गायब झालेले कोरोना पॉसिटीव्ह गावाकडे तर गेले नाहीत ना आणि तसे होत असताना ते ज्या माध्यमांमधून गावाकडे गेले तिकडून सुद्धा कोरोनाचा प्रसार कसा झाला असेल हे शोधून काढणे आता प्रशासनापुढचे मोठे आव्हान आहे. लहान लहान खेडेगावांनी व शहरांनी त्यांच्या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या लोकांना टेस्ट करूनच मग गावात घेणे फायद्याचे ठरणार आहे असे बोलले जात आहे.