Home महाराष्ट्र मुंबई महिलांनंतर आता सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करण्याची मागणी; राज्य सरकारकडून रेल्वेला पत्र

महिलांनंतर आता सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करण्याची मागणी; राज्य सरकारकडून रेल्वेला पत्र

0

गेल्या सात महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबईतील प्रमुख वाहतूक व्यवस्था अर्थात लोकल ट्रेन्स आता सर्वांसाठी सुरु करण्याचा विचार होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हळूहळू आटोक्यात येत असल्याचे दिसत असल्याने आता सर्व गोष्टी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. काही दिवसांपूर्वी लोकल सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी व त्यानंतर महिलांसाठी सुरु करण्यात आली. तेव्हापासून सर्वसामान्यांसाठीही लोकल्स सुरु कराव्या अशी मागणी होत होती. म्हणूनच राज्य सरकारने या मुद्द्याकडे लक्ष देऊन केंद्र सरकार व रेल्वेला याबाबत पत्र पाठवले आहे.

या पत्रात लोकल ट्रेन्स टप्प्याटप्प्याने सुरु कराव्या व निश्चित वेळेसच सुरु कराव्या असे नमूद केले आहे. बीबीसी मराठीच्या मीडिया न्यूजनुसार तिकीट किंवा पास असणाऱ्या सकाळी ७.३० वाजेपर्यंत, सकाळी ११ ते दुपारी ४.३० पर्यंत व संध्याकाळी ८ वाजेनंतर सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी व सकाळी ८.३० ते १०.३० व संध्याकाळी ५ ते ७.३० दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करता येईल असे राज्य सरकारने रेल्वेला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. हे पत्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाला व रेल्वे पोलिसांना उद्देशून लिहिले आहे.