Home महाराष्ट्र पुणे मुंबई पुण्यात अडकलेल्यांसाठी खूशखबर, एसटी मोफत बसेस सोडणार

मुंबई पुण्यात अडकलेल्यांसाठी खूशखबर, एसटी मोफत बसेस सोडणार

0

राज्यामध्ये ठिकठिकाणी लॉकडाउन मुळे अडकून पडलेल्या विविध नागरिकांसाठी लालपरी अर्थात आपली एसटी धावून आलीं आहे. विविध आगारांमधून एसटी ही मोफत बस सेवा सुरू करणार आहे.

राज्यात विविध ठिकाणी असणाऱ्या लोकांना त्यांच्या गावांच्या दिशेने पाठवण्यासाठी जवळपास १० हजार एसटी बस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मदत व पुनर्वसन विभाग यासाठीचा खर्च उचलणार आहे. राज्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी जवळजवळ २० कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी याबाबतची माहिती दिली. तेव्हा आता महाराष्ट्रामधील वेगवेगळया जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी एसटीने मोफत जाता येणार.

येत्या दोन दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. ज्यामध्ये राज्यातील मुंबई पुण्यासह सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गेलेले लोक असतील या सर्वच लोकांना आपल्या घरी जाता येणार आहे. मुख्य म्हणजे कोरोनासाठीची आवश्यक चाचणी करुनच नागरिकांना पुढच्या प्रवासाला जाता येणार आहे. पण, अपेक्षित स्थळी त्यांना प्रवेश मिळणार का, हाच महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.