Home महाराष्ट्र मुंबई मुंबईसह नजीकच्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता!

मुंबईसह नजीकच्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता!

0

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग मध्ये जोरदार पावसाचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तविला आहे. तसेच मुंबई ,ठाणे ,पालघरमध्ये ६ सप्टेंबर पर्यंत हलक्या सरी पडणार आहेत. मुंबईत आज पासून दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा जाणावू लागल्या आहेत.

सांताक्रूझ येथील तापमानात आज 2 अंशाने वाढ झाली आहे. तसेच ,बुधवारी सकाळी 8.30 वाजे पर्यंत संपलेल्या 24 तासात कुलाबा येथे कमाल 30 अंश आणि किमान 25.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर, आज संध्याकाळ पर्यंत कमाल 32 आणि किमान 24.8 अंशाची वाढ नोंदवली आहे. कुलाबा येथेही कमाल तपामानात आज दिवसात 1 अंशांची वाढ नोंदविण्यात आले आहे. कुलाबा येथे आज संध्याकाळ पर्यंत कमाल 31.5 आणि 25.8 अंश सेल्सिअस तपामानाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस तापमान याच पातळीवर राहाणार आहे. तर, मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात 6 सप्टेंबर पर्यंत पावसाच्या हलक्‍या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

शुक्रवारी रायगड, रत्नागिरीसह सिंधदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. कोकणात रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.