Home महाराष्ट्र मुंबई मुंबईतील सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग; वेळेत अग्निशमन दल आल्याने जीवितहानी टळली

मुंबईतील सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग; वेळेत अग्निशमन दल आल्याने जीवितहानी टळली

0

काल २२ ऑक्टोबरला रात्री ९ वाजेच्या सुमारास मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग लागली. ही आग मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील एका मोबाईलच्या दुकानात सुरु झाली व त्यानंतर पसरत गेली. आग लागली त्यावेळी बरेच लोक मॉलमध्ये उपस्थित होते. त्यामुळे तब्बल ४०० हुन अधिक लोक तिथे आगीत अडकले होते. परंतु मॉलच्या व्यवस्थापकांनी तातडीने अग्निशमन दलाला बोलावल्यामुळे जीवित हानी टळली व सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

मीडिया न्यूजनुसार स्थानिक अग्निशमन दल तिथे पोहचल्यानंतर आग वाढत गेली. त्यामुळे आणखी अग्निशमन दलांना बोलवावे लागले. त्यात अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही आग विझवण्याचे अजूनही प्रयत्न चालू असून बहुतांशी आग कंट्रोलमध्ये आल्याचे सांगितले जात आहे. या आगीमुळे मॉलच्या जवळील बिल्डींग्समधील लोकांना सुरक्षितठिकाणी हलवण्यात आले आहे.