Home महाराष्ट्र पुणे मुंबई आणि पुण्यात आता सशस्त्र दलाला पाचारण, बाहेर निघू नका नाहीतर!

मुंबई आणि पुण्यात आता सशस्त्र दलाला पाचारण, बाहेर निघू नका नाहीतर!

0

कोव्हीड मुळे पोलिसांवर वाढत असलेला ताण आणि अविरत केलेल्या कामामुळे थकलेल्या पोलिसांना आराम मिळावा म्हणून राज्य सरकारने केंद्राकडे अतिरिक्त पोलिसांची मागणी केली होती. त्याची पूर्तता म्हणून आता पूणे शहर हे आता सशस्त्र दलाच्या हातात देण्यात येणार आहे.

” महाराष्ट्र पोलीस हे दिवस रात्र एक करून कोव्हीड योद्धे बनत आहेत, असे करताना मात्र त्यांच्या जीवनाचे असंख्य हाल होत आहेत. विनासुटीचे सतत काम करत असताना त्यांच्यावरचा ताण कमी व्हावा म्हणून केंद्राकडून सशस्त्र दलाची पथके बोलावण्यात आली आहेत, सोबतचं रमजान ईद जवळ येत असल्याने, कुठेही शिस्तभंग होणार नाही याची सुद्धा काळजी घेण्यात येईल”, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

कोरोना योद्धा म्हणून लढत असणारे पोलीस हे अहोरात्र काम करत असून आतापर्यंत जवळ जवळ ९०० पोलिसांना कोरोणाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अत्यन्त कठीण प्रसंगामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याचे मानावे तितके आभार कमीच आहेत. अशा वेळी पोलिसांचा विचार करून राज्य सरकारने अधिकाधिक सोयी त्यांच्यासाठी तसेच सर्व कोरोना योद्धे यांच्यासाठी सुद्धा कराव्यात अशी सर्वांची अपेक्षा आहे.