पाकिस्तान आणि बांगलादेश घुसखोरां विरुद्ध मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज उठवलाय. मुंबईच्या आझाद मैदानात देशा बाहेरच्या घुसखोरां विरुद्ध मनसे कडून विराट मोर्चा काढण्यात आला. मनसे ने पक्षाच्या बदललेल्या ध्येय धोरणा नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी प्रथमच केंद्र सरकारला सीएए आणि एनआरसी साठी जाहीर पाठिंबा दिल्याचं दिसून आलं.
तसंच एनआरसी विरुद्ध बोलणाऱ्यांना इशारा दिला. राज ठाकरे यांनी घुसखोर मुस्लिमां विरुद्ध जरी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला असला तरी, या विराट मोर्चाला मोठ्या प्रमाणात मुस्लिमांनी देखील मनसे हजेरी लावली असल्याचं दिसून आलं. मुस्लिमांनी यावेळी सांगितलं कि, राज ठाकरे यांची मागणी योग्य असून ती, घुसखोरां विरुद्ध आहे, त्यामुळे भारतीय मुस्लिमांनी यासाठी चिंतातुर होण्याचं कारण नाही. मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वरून मोर्चातील मुस्लिमांची हजेरी अधोरेखित करण्यात आली.
राज ठाकरेंनी भाषणात म्हटलं, हा देश आणि महाराष्ट्र मुस्लिमांचा आहे, ज्या ठिकाणी बाहेरून मुस्लिम येथे आले आहेत, त्याच ठिकाणी दंगली झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बांगलादेशी घुसखोरच नाही तर, वसई – विरार, मीरा, भाईंदर येथे नायजेरियन घुसखोरांनी उच्छाद मांडल्याचे राज ठाकरेंनी सांगितलं.