Home आरोग्य आता नागपूरमधील प्रत्येक दुकानदाराला कोरोना चाचणी करावीच लागणार : तुकाराम मुंढे

आता नागपूरमधील प्रत्येक दुकानदाराला कोरोना चाचणी करावीच लागणार : तुकाराम मुंढे

0

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक महत्वाचा आदेश दिला आहे. नागपुरमध्ये आतापर्यंत ११ हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली असून मृतांचा आकडा ४०० च्या वर गेला आहे. याच पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी नागपूरमधील सर्व दुकानदारांना तसेच दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक केले आहे..

यासाठी सर्व दुकानदारांना १८ ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणी करण्यास सांगितले गेले आहे. या चाचणीचे सर्टिफिकेट दुकानदारांना दुकानात ठेवण्यास सांगितले आहे. तसेच कोरोना चाचणीचे सर्टिफिकेट नसणाऱ्या दुकानदारांवर नागपूर महापालिकेकडून कारवाई करण्यात येईल. नागपूर शहरात जवळपास ३०,००० दुकाने आहेत. या दुकानांचे दुकानदार व कर्मचारी मिळून ७० ते ८० हजार लोक आहेत व त्यांना कोरोना चाचणी करणे सक्तीचे केले आहे अशी माहिती टीव्ही9 मराठीच्या मीडिया रिपोर्टवरून मिळाली.