Home महाराष्ट्र स्वच्छ भारत सर्वेक्षणात नवी मुंबईने पटकावला तिसरा क्रमांक!

स्वच्छ भारत सर्वेक्षणात नवी मुंबईने पटकावला तिसरा क्रमांक!

0

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबवलेल्या ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०’ चा निकाल जाहीर झाला असून हरदिपसिंग पुरी यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हा निकाल जाहीर केला. सलग चौथ्या वर्षी इंदौर हे शहर देशातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर ठरले आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर गुजरातमधील सुरत हे शहर असून तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील नवी मुंबई हे शहर आहे. २०१९ च्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात नवी मुंबई सातव्या क्रमांकावर होती. २०१६ पासून स्वच्छ शहर सर्वेक्षणाला सुरुवात झाली.

नवी मुंबईसह महाराष्ट्रातील इतरही शहरांचे नाव स्वच्छ शहरांच्या यादीत आले आहे. त्यानुसार नाशिक ११ क्रमांकावर, ठाणे १४व्या क्रमांकावर, पुणे १५व्या क्रमांकावर तर नागपूर १८व्या क्रमांकावर आपले आहे. या अभियानासाठी स्वच्छता ऍपवरून तब्बल १ कोटी ७० लाख लोकांनी नोंदणी केली होती.