Home महाराष्ट्र अजित पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही: स्वतः शरद पवारांनी केला खुलासा

अजित पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही: स्वतः शरद पवारांनी केला खुलासा

0

आज सकाळी अचानक राज्याच्या राजकारणाने एक अनोखे वळण घेतले. रातोरात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यपालांची भेट घेऊन सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या निर्णयाला शरद पवारांचीही साथ असेल अशी चर्चा होती. मात्र एक ट्विट करून शरद पवार यांनी या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

शरद पवार यांचं सविस्तर ट्विट खालील प्रमाणे…

“अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही.
हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.” असं ट्विट शरद पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केलं. परिणामी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.