Home महाराष्ट्र ‘ईडी झाली येडी’ : संतप्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा ईडी कार्यालयाबाहेर मोर्चा

‘ईडी झाली येडी’ : संतप्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा ईडी कार्यालयाबाहेर मोर्चा

0

नुकत्याच समोर आलेल्या को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे पडसाद आज राज्यभर उमटत असल्याचे दिसून येत आहेत. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत.

शरद पवारांचे कार्यक्षेत्र असलेल्या बारामती तसेच इंदापूर येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून कडकडीत बंद पुकारण्यात आला. त्यामुळे बारामतीतील शाळा, कॉलेजेस ला सुट्टी देण्यात आली असे समजले. याशिवाय पुणे, बीड, नाशिक, परळी, सोलापूर, औरंगाबाद, ठाणे या शहरांमध्ये देखील विविध स्वरूपांची आंदोलने करण्यात आली. तसेच काही युवा कार्यकर्ते मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेर मोर्चा घेऊन आले. कार्यकर्त्यांनी तेथे सरकारच्या आणि ईडीच्या विरोधात निर्देशने केली. ईडीने पवारांवर केलेले आरोप खोटे असून ‘ईडी झाली येडी’ अशा घोषणा कार्यकर्ते पुकारत होते. मात्र पोलिसांनी लाठीचार्ज करून हे आंदोलन थांबवले आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले असे मीडिया न्यूजमधून समोर आले आहे. कार्यकर्त्यांसह तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांवरही पोलिसांनी लाठीचार्ज केला असे सांगण्यात येत आहे.