Home महाराष्ट्र आदित्य ठाकरेंच्या विरोधात तगडा व अनुभवी उमेदवार: शरद पवारांचं हे राजकारण आदित्य...

आदित्य ठाकरेंच्या विरोधात तगडा व अनुभवी उमेदवार: शरद पवारांचं हे राजकारण आदित्य ठाकरेंना महागात पडणार?

0

राजकीय वर्तुळात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध कसे होते हे सर्वाना ठाऊकच आहे. काहीही झालं तरी पवार घराण्यातील कुठल्याही उमेदवाराविरुद्ध सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवार दिला नव्हता. अर्थात सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत हा अनुभव मागील अनेक वर्षांपासून येतच आहे हे वेगळं सांगायला नको. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी वरळी विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदा शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशा वेळी शरद पवार यांनी मदतीची भूमिका न घेता आदित्यच्या विरोधात तगडा उमेदवार उभा केला आहे.

मीडिया न्यूज नुसार जेव्हा सुप्रिया सुळे राज्यसभेच्या निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या त्यावेळी शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती आणि बाळासाहेबांनीही सुप्रिया सुळे यांना बिनविरोध निवडून देण्याचा शब्द दिला होता. मात्र आता जेव्हा ठाकरे कुटुंबियांना मदतीची गरज आहे तेव्हा पवारांनी डॉ. सुरेश माने यांना आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध उमेदवारी देऊन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.

बाळासाहेबांच्या पश्चात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील संबंध फारसे चांगले राहिलेले नाहीत. शिवसेना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर बसविण्याच्या प्रयत्नात असतांना पवारांचं हे राजकारण आदित्यला महागात पडणार का हे आता येत्या काही दिवसात कळेलच. तोपर्यंत ही विधानसभेची रणधुमाळी कुठल्या वाटेवर जाते त्यावर जनतेचे विशेष लक्ष असेल.