खासदार संजय राऊत राज्यसभेतील आसनव्यवस्था बदलल्याप्रकरणी काहीसे नाखूश आहेत. राऊत यांनी बुधवारी राज्यसभेचे सभापती यांना या यासंदर्भात पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान लोकमतने या संधार्भात एक रिपोर्ट ट्विट केला त्यालाच रिट्विट करत भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राऊत यांच्यवर निशाणा साधला आहे तेही एकेरी उल्लेख करत.
या ट्विट मध्ये निलेश राणे म्हणाले “संज्याला रड्या ऑफ द ईयर अवॉर्ड द्यायला पाहिजे” या सह “तिसऱ्या रांगे वरून पाचव्या रांगेत बसवला म्हणून परत रडायला लागला.” असाही त्यांनी उल्लेख केला. परिणामी या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
त्याचं सविस्तर ट्विट पुढील प्रमाणे….
“तिसऱ्या रांगे वरून पाचव्या रांगेत बसवला म्हणून परत रडायला लागला. 2019 चा “रड्या ऑफ द ईयर अवार्ड” संज्यालाच दिला पाहिजे. मी कुठे बसतो त्यापेक्षा त्या पदाचा उपयोग देशाला कसा होईल हा विचार पाहिजे पण याचं राजकारण म्हणजे मी, मला आणि मीच.”