Home महाराष्ट्र “स्वातंत्र्यलढ्यात बाळासाहेबांचे योगदान काय? ” – निलेश राणे

“स्वातंत्र्यलढ्यात बाळासाहेबांचे योगदान काय? ” – निलेश राणे

0

आपल्या विविध विधानांमधून सदैव चर्चेत रहाणारे नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. इंदिरा गांधी काळातील आणीबाणीचा दाखला देत, तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अटक होऊ नये म्हणून इंदिरा गांधींशी मांडवली केली होती असा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे. मीडिया न्यूजनुसार शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ मध्ये सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावर प्रत्युत्तर म्हणून राणे यांनी असे वक्तव्य केले आहे.

“स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान कुठे आहे? भाजपला आलेला सावरकरांचा पुळका धाधांत खोटा आहे व राष्ट्रप्रेमाच्या नावावर भाजप राजकारण करते” असा दावा सामना या वृत्तपत्राद्वारे करण्यात आला. यावर प्रत्युत्तर म्हणून निलेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. बाळासाहेब आणि आणीबाणीचा दाखला देत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न निलेश राणेंनी केला.

याला प्रत्युत्तर देत निलेश राणे यांनी “स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात??? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते??? अटक होऊ नये म्हणून आणी बाणीत स्व. इंदिरा गांधीजीशी मांडवल्ली केली बाळासाहेबांनी तो इतिहास लोकं विसरलेली नाही” असे ट्विट केले.

बघा काय म्हणाले निलेश राणे