Home महाराष्ट्र राजकीय आरक्षण बंद करा, आता त्याची गरज नाही : प्रकाश आंबेडकर

राजकीय आरक्षण बंद करा, आता त्याची गरज नाही : प्रकाश आंबेडकर

0

डॉक्टर बाबासाहेब आंबडेकरांचे नातू ऍड प्रकाश आंबेडकर यांनी “देशात लागू असलेले राजकीय आरक्षण म्हणजेच लोकसभा, राज्यसभा निवडणूकवेळी असलेल्या मागासवर्गीय राखीव जागा यांची आता गरज नसून वेळीच हे आरक्षण काढून टाकायला हवे”,असे मत मांडले आहे.

आंबेडकर हे एका वृत्तवाहिणीच्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी त्यांना आरक्षणाविषयी प्रश्न विचारण्यात आला की बाबासाहेबांनी फक्त १० वर्ष आरक्षणाची मागणी केली होती, यावर उत्तर देताना प्रकाश अंबेडकर म्हणाले, ” ही एक चुकीची माहिती आहे की सर्व आरक्षण हे १० वर्षांसाठी होते, १० वर्ष आरक्षण हा विषय फक्त राजकीय आरक्षणाचा होता. बाबासाहेबांनी १९५४ मध्ये आता या आरक्षणाची गरज नसल्याचे सुद्धा सरकारला सांगितले होते पण तेव्हापासून आज पर्यंतच्या कुठल्याच सरकारने हे आरक्षण हटवले नाही, आज आम्ही अनेक आंबेडकरी कार्यकर्ते या आरक्षण हटवण्याच्या मुद्द्यावर ठाम आहोत मात्र काँग्रेस असो की भाजप यांच्या व्होट बँकेच्या राजकारणाला हे आरक्षण हटवायचे नाही”

काय आहे राजकीय आरक्षण हा प्रकार?

ब्रिटन मध्ये गोलमेज परिषदेवेळी त्याकाळच्या अस्पृश्य समाजाला स्वतंत्र मतदारसंघ १० वर्षांसाठी मागण्यात आला होता ज्यामध्ये फक्त अस्पृश्य व्यक्तींच्या व्यक्तीला मतदान करता येईल आणि त्यांना हवा असा त्यांचा नेता सरकरमध्ये धाडता येईल असा यामागचा हेतू होता, या नेत्यावर अस्पृश्य आणि मागास वर्गाचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी देण्यात येणार होती. यामध्ये शाळा,महाविद्यालयात किंवा सरकारी नोकऱ्या यामध्ये कुठल्याही आरक्षणाचा उल्लेख नव्हता. वरील मागणीला ब्रिटिश सरकारने मान्यता दिली होती मात्र गांधीजी या निर्णयाच्या विरोधात असल्यामुळे ते आमरण उपोषणाला बसले आणि डॉ आंबेडकर आणि गांधीजी यांच्यात पुणे करार घडला यानुसार सद्याच्या राजकीय आरक्षणाची संकल्पना जन्माला आली आणि राखीव जागा असाव्यात असे ठरले.