
गेल्या अनेक दिवसांपासून सत्ता स्थापनेसाठी आतुर असलेली शिवसेना अद्याप काँग्रेसच्या उत्तराची वाट पाहत आहेत दरम्याम शिवसेनेने “आता लवकर निर्णय घ्या” असा निरोप पाठवला होता ज्याला सोनिया गांधींनी केवळ एका शब्दात उत्तर दिलं आहे.
शिवसेना आता चंगलीच पेचात अडकल्याची चिन्ह आहेत, सत्ता स्थापनेसाठी झटपट निर्णय घेतले खरे पण आता शिवसेनेची घालमेल वाढली आहे. कारण “आता लवकर निर्णय घ्या” या शिवसेनेच्या निरोपाला संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा आणि काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केवळ ‘नो कॉमेंट्स’ इतकंच उत्तर दिलं आहे; अर्थात बैठकी झाल्या, चर्चा झाली, निर्णय झाले तरी निर्णयाला उशीर का हे शिवसेनेला कळायला मार्ग नाही.