Home अर्थजगत बाहेर राज्यातून कांदा मागवल्यामुळे किमतीत २ दिवसात पंधराशे रुपयांची घसरण: कांद्याने आणले...

बाहेर राज्यातून कांदा मागवल्यामुळे किमतीत २ दिवसात पंधराशे रुपयांची घसरण: कांद्याने आणले बळीराजाच्या डोळ्यात पाणी.

0

एकीकडे ज्या सर्वसामान्य जनतेसाठी सत्ता उभी केली जाणार आहे. त्या सत्तेचं महाभारत काही थांबायचं नाव घेत नाहीये आणि दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक आणि बळीराजा यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. नाशिकचा कांदा सहा हजारांच्या पुढे वाटचाल करीत असतानाच अचानक मध्येच कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश व गुजरात या राज्यांतील लाल कांदा चांगल्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल झाला आहे. त्यामुळे दोनच दिवसांत कांद्याच्या किमतीत सुमारे एक हजार ते पंधराशे रुपयांची घसरण झाली. परिणामी सध्या कांद्याचे भाव चार हजार रुपयांच्या दरम्यान आले आहेत. जर असंच चालत राहीलं तर शेतकऱ्यांनी पोटाची खळगी भरायची कशी असे प्रश्न शेतकऱ्यांकडून केले जात आहेत.

यंदा अवकाळी पावसामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालं. त्यात लाल कांदाही गेला. म्हणून जर उत्पादन कमी असेल तर भाव जोर घेईल. अशा अपेक्षेवर बळीराजा असतांना त्यांच्या अपेक्षांवर बाहेर राज्यातील कांद्याने पाणी फेरले आहे. राज्यात अन्न पिकवणाराच भुकेला झोपतोय अशी परिस्थिती झाली आहे.