
देशातील विविध मंदिरांमध्ये सोने आणि इतर मालमत्तेचा १ खरब एवढा मोठा साठा आहे यामध्ये सोन्याच्या आधारे सरकार ७६ लाख करोड रुपये सहज उभे करू शकते असे विधान काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे.
” मंदिरांच्या तिजोरीत असलेलं सोनं हे आपल्या सगळ्यांचं आहे, आणि आताच्या युद्धजन्य परिस्तिथीमध्ये उद्भवलेल्या आर्थिक संकटात याचा फायदा व्हायलाचं हवा”, असे माजी मुख्यमंत्री म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी सदर विधान केल्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीकेची झोड उठवली, काँग्रेस वाल्यांची नजर मंदिरांवरच का पडते असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला यावर उत्तर देत पाटील म्हणाले, ” मंदिरातील सोने तारण ठेवून कर्ज काढण्याची संकल्पना ही अटल बिहारींनी सुरू केली होती त्यामुळे याचा फक्त काँग्रेस आग्रह धरते असे काहीही नाही”.
किती आहे देशातील मंदिरामधली संपत्ती
पद्मनाभ स्वामी मंदिर : ९०० अब्ज रुपये
तिरुपती बालाजी : ८००० किलो सोने
शिर्डी संस्थान : ५०० किलो सोने
सिद्धिविनायक संस्थान : ५० कोटींचे सोने
कमोडिटी एक्स्पर्ट च्या मते देशात २५००० टन एवढे सोने मंदिरांजवळ आहे.