Home महाराष्ट्र पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना बिल गेट्स यांच्या हस्ते लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार

पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना बिल गेट्स यांच्या हस्ते लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार

0

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविण्यात आलं. रविवारी १७ नोव्हेंबर रोजी डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्यासह डॉ. सायरस पूनावाला, डॉ. किरण मझूमदार-शॉ  यांना देखील बिल गेट्स यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. 

दिल्लीतील आयसीएमआर हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. डॉ. प्रकाश आमटे यांनी १९७३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाला सुरुवात केली. परिणामी अशिक्षित व गरीब आदिवासींना आरोग्य सुविधा व शिक्षण मिळू लागलं. महत्वाचं म्हणजे त्या जनतेची अंधश्रद्धेच्या विळख्यातूनही मुक्तता झाली. याआधी देखील डॉ. प्रकाश आमटे यांना अनेक सन्मान देऊन पुरस्कृत करण्यात आलं आहे मात्र बिल गेट्स यांच्या हस्ते गौरव होणं, ही आपल्या महाराष्ट्रासाठीच नाही तर सबंध देशासाठी अभिमानाची बाब आहे.