Home महाराष्ट्र पंकजा मुंडे यांचा गौप्यस्फोट – दिग्गज नेत्यांचे तिकीट कापण्याचा निर्णय दिल्लीत...

पंकजा मुंडे यांचा गौप्यस्फोट – दिग्गज नेत्यांचे तिकीट कापण्याचा निर्णय दिल्लीत नसून महाराष्ट्रातच…

0

मागील अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर काहीतरी मोठी घोषणा किंवा गौप्यस्फोट करणार अशी चर्चा होती मात्र त्या आधीच पंकजा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेच्या एका वृत्तानुसार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारांना तिकीटांचे वाटप करण्यात आले होते दरम्यान एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे, प्रकाश मेहता या प्रमुख नेते आणि माजी मंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांना व उमेदवारांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आले होते. यांना तिकीट न देण्याचा निर्णय हा दिल्लीत नसून महाराष्ट्रातच घेण्यात आला होता, असा महागौप्यस्फोट पंकजा यांनी केला आहे. ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडे म्हणाल्या “यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने केवळ 105 जागा जिंकल्या या खराब कामगिरीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली पाहिजे” अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेच्या एका वृत्तानुसार मिळत आहे.