Home महाराष्ट्र अखेर पंकजा मुंडें म्हणाल्या, पक्ष सोडणार नाही पण…

अखेर पंकजा मुंडें म्हणाल्या, पक्ष सोडणार नाही पण…

0

पंकजा मुंडे मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात व्हरचेच विषय ठरला आहेत. प्रथम त्यांनी भाजपच्या नेत्या आणि माजी महिला व बालकल्याण मंत्री ही ओळख ट्विटर वरून पुसून टाकली नंतर केलेली फेसबुक पोस्ट! यांचा परिणाम थेट गैरसमज निरामन झाले आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रसारमाध्यमांना व चंद्रकांत पाटलांनी घेतलेल्या विशेष पत्रकार परिषेदेत सर्वांनी ‘पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत’ असे सांगितले मात्र पंकजा मुंडे यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही म्हणून महाराष्ट्र कोड्यात होता आता मात्र ते कोडं सुटलं आहे. पंकजा मुंडेंनी यांनी पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

नाराजी व्यक्त करीत पंकजा मुंडे म्हणाल्या “मी पक्ष सोडणार नाही पण माझ्या फेसबुक पोस्टवरील पक्षांतराच्या खोट्या बातम्यानंतर उलट माझ्यावरच पदासाठी मी हे करत असल्याचा आरोप होत आहेत. खरंतर मला कुठलं पद मिळू नये म्हणून तर कुणी असं सुरु केलं नाही ना? असा मला प्रश्न पडत आहे” त्याच बरोबर सर्व प्रकारच्या खुलासा करीत त्या म्हणाल्या “मी फक्त 12 डिसेंबरला बोलेल असं मी सांगितलं होतं. कारण मला आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी बोलण्यासाठी वेळ हवा आहे आणि तो वेळ मला दिला पाहिजे. मी ती फेसबुक पोस्ट आत्ता केली त्यामुळे आत्ताच त्यावर बोलणं किंवा कुठलाही भाष्य करणं मला शक्य नाही. मी दरवर्षी गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम आयोजित करते. माझ्या फेसबुक पोस्टवर सुरुवातीला सर्वच चॅनलने व्यवस्थित बातमी दिली होतो. मात्र काही दोन वर्तमानपत्रांनी ‘पंकजा मुंडे पक्ष सोडणार’ अशी बातमी दिल्याने गैरसमज पसरला. आता खरं करण राहील बाजूला व सर्व चर्चेला वेगळा सूर आला आहे. जेघड त्यामुळे मी खरंच खूप दुःखी आणि व्यथित आहे, असंही त्यांनी सांगितलं.”