Home महाराष्ट्र धनंजय मुंडे यांच्या स्वागतार्थ परळीकरांनी उभारली सोन्याच्या अलंकारांची कमान!

धनंजय मुंडे यांच्या स्वागतार्थ परळीकरांनी उभारली सोन्याच्या अलंकारांची कमान!

0

धनंजय मुंडे यांची सामाजिक न्याय मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाली असून त्यांनी हा पदभार स्वीकारल्यानंतर परळी शहरात काल प्रथमच त्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. परळीत अनेक ठिकाणी सजावट करण्यात आली असून सोनार लाईन रोडवरील एका कमानीने लोकांचे विशेष लक्ष आकर्षित केले. परळीकरांनी या कमानीला चक्क सोन्याचे दागिने लावून धनंजय मुंडे यांच्या स्वागतार्थ सुवर्ण अलंकारांची कमान सज्ज केली होती.

न्यूज 18 लोकमतच्या रिपोर्टनुसार यापूर्वी 1989 मध्ये परळीत बाळासाहेब ठाकरे यांचं अशा सुवर्णालंकारांनी सजवलेल्या कमानींनी स्वागत करण्यात आलं होतं. परळीकरांनी हे दागिने जमा करून लावले असून यातील प्रत्येक दागिना पाच तोळ्याचा होता या कमानीवर सीसीटीव्ही कॅमेरे विशेष लक्ष ठेवून असून कमालीची काळजी घेण्यासाठी सुरक्षा रक्षकही सज्ज होते. एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी विविध राज्यांतून बँड पथक बोलवण्यात आले होते. जोडीला फटाक्यांची आतिषबाजी व तब्बल दीड क्विंटल वजनाचा पुष्पहार क्रेनद्वारे घालून त्यांचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले.