Home महाराष्ट्र फेसबुक पोस्ट टाकली म्हणून जितेंद्र आव्हाडांनी बंगल्यावर नेऊन पाईप तुटेपर्यंत मारल्याचा...

फेसबुक पोस्ट टाकली म्हणून जितेंद्र आव्हाडांनी बंगल्यावर नेऊन पाईप तुटेपर्यंत मारल्याचा आरोप

0


राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाणे  एका तरुणाने केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. आव्हाड यांच्यासमोर त्यांच्याच बंगल्यावर नेऊन आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप या तरुणानं केला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. पंतप्रधान मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर अतिशय सडकून टीका केली होती. आव्हाडांच्या या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल अत्यंत घाणेरडी पोस्ट केली होती.
तरुणाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार “५ एप्रिलच्या रात्री ११.५० च्या सुमारास दोन पोलीस साध्या वेशामध्ये माझ्या घरी आले. या पोलिसांनी पोलीस स्टेशनला तुम्हाला बोलवलं आहे, असं सांगून मला सोबत येण्यास सांगितलं आणि त्यांनतर मला आव्हाड यांच्या बंगल्यावर नेण्यात आले. इथे माझ्यावर पाईप ने असंख्य वार केले आणि तदनंतर माझी अत्यन्त बिकट अवस्था होती, हे सर्व होत असताना जितेंद्र आव्हाड तिथेच उपस्तिथ होते”

सदर प्रकरणानंतर सोशल मीडिया वर खूप प्रतिक्रिया आल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण देत सदर तरुणाने कसे अश्लील चित्र टाकून त्यांचा अपमान केला होता हे ट्विट करत स्पष्ट केले.