Home महाराष्ट्र रामदास आठवलेंच्या कानशिलात मारणाऱ्या प्रवीण गोसावीने केला गुन्हा दाखल…

रामदास आठवलेंच्या कानशिलात मारणाऱ्या प्रवीण गोसावीने केला गुन्हा दाखल…

0
ramdas athawale

भारतीय रिपब्लिक पार्टीचे अध्यक्ष तसेच केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत गेल्या वर्षी ८ डिसेंबर रोजी एक विचित्र प्रकार घडला होता. अंबरनाथ येथील नेताजी मार्केट मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आठवलेंच्या जाहीर सभेदरम्यान ते स्टेजवरून खाली उतरत असतांना प्रवीण गोसावी नावाच्या इसमाने पुष्पगुच्छ देण्यासाठी स्टेजकडे जाऊन त्यांच्यावर हात उचलला होता. हे बघून सभेला उपस्थित कार्यकर्त्यांनी त्या इसमाला जबर मारहाण केली होती. तसेच त्या इसमावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाला आता जवळपास १० महिने होऊन गेले आहेत. इतका कालावधी उलटून गेल्यानंतर गोसावी यांनी त्या सभेचे आयोजक अजय जाधव आणि सुमेध भवार या दोघांवर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे असे मीडिया रिपोर्ट वरून समजले. सुमेध भवार हे मनसेचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. निवडणुका जवळ आल्या असतांना गुन्हा दाखल झाल्याने त्यांना निवडणुकीत अडचण येऊ शकते असे मीडिया रिपोर्ट मध्ये सांगण्यात येत आहे.