Home महाराष्ट्र “मदतीच्या नावाखाली फक्त फोटो काढून सोशल मीडिया वर टाकल्यास आता गुन्हा दाखल...

“मदतीच्या नावाखाली फक्त फोटो काढून सोशल मीडिया वर टाकल्यास आता गुन्हा दाखल होणार” – अनिल देशमुख

0


मदतीच्या नावाखाली फक्त फोटो काढणाऱ्यांवर आता पोलीस कारवाई करणार आहेत. मदतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले गेल्यास गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट शब्दात आदेश प्रशासनाने दिले आहेत. सरकारच्या आदेशाने फोटोबाजांचे मात्र धाबे दणाणले आहेत. दरम्यान, समाज माध्यमांचा दुरुपयोग करून काही समाजकंटक लोकांकडून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा, समाजामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न मुद्दामहून केला जात आहे, त्यांच्यावर महाराष्ट्र सायबर पोलीसचे लक्ष आहे. असे काही करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई होणार, असे स्पष्ट संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. 

अशा गरजूंच्या मदतीसाठी लाखो हात पपुढें आले आहेत. मदत करणाऱ्या दानशूर लोकांमधेचं काही हौशी फोटोबाजांनी घुसखोरी केलीय. चार आण्याची मदत करायची आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल करायचे असा सगळा प्रकार सुरु आहे. त्यामुळं मदत नको पण फोटोसेशन आवर असं म्हणण्याची वेळ सामान्यांवर आलीय. त्यामुळंच प्रशासनानं आता मदतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

“मदत करा पण त्याचं एवढं मार्केटिंग करु नका की मदत घेणाऱ्याला अगदी अपमानास्पद वाटेल. मदत घेणाऱ्याला तुमचा अभिमान वाटायला हवं असं वागा आणि त्याला वागणूक द्या!”,असे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनामुळे प्रत्येक जण संकटामध्ये आहे. त्यामुळे दुसऱ्याला संकोच वाटेल असे कृत्य अजिबात करु नका, नाहीतर कारवाई होण्यास सज्ज राहा, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.