
महिन्याकाठी हाती येणार पगार जेमतेम असतो जर तोही पूर्ण मिळत नसेल तर घर चालवायचं कसं? असा प्रश्न आता एसटी कर्मचाऱ्यांना पडला आहे. कारण हा महिना एसटी कर्मचाऱ्यांना अतिशय अवघड जाणार आहे. आधीच पगार कमी त्यात 60% पगार मिळला म्हणजे दुष्काळात तेरावा महिना! असे काहीसे हाल एसटी कर्मचाऱ्यांचे झाले आहेत.
एसटी महामंडळाकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्या इटके देखील पैसे नाहीत म्हणून महामंडळाच्या 31 पैकी 11 विभागाच्या कर्मचाऱ्यांना 60 टक्के पगार हातात टेकवण्यात आला आहे व ‘अवकाळी पावसामुळे पूर्ण पगार देत येणार नाही’ असं सांगितलं. परिणामी आता महामंडळाचं विलिनीकरण करण्याची मागली होत आहे. महामंडळाने पगार कपातीचं दिलेलं कारण बिन बुडाचं आणि अजब आहे अशी चर्चा आहे. या उलट आमदार भाई जगताप म्हणाले “महामंडळ डबघाईला येणार याची आम्हाला कल्पना होतीच म्हणूनच एसटी महामंडळाचं विलिणीकरण करा, अशी मागणी आम्ही पूर्वीपासून करत आहोत” आता खरच महामंडळाचे विलिणीकरण होणार का ? याकडे सर्वांचेल लक्ष लागले आहे