Home महाराष्ट्र पुणे पुण्यातील दोन उड्डाणपूल पाडणार, नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याची विनंती

पुण्यातील दोन उड्डाणपूल पाडणार, नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याची विनंती

0

शहरातील विद्यापीठ चौकात असलेले दोन उड्डाणपूल हे मेट्रोच्या बांधकामांसाठी पाडण्यात येणार असून नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याची विनंती पुणे महानगर बांधकाम प्राधिकरण यांनी केली आहे. या उड्डाणपुलात गणेश खिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौक आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाणपुल समाविष्ट आहेत.

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानचे मेट्रो बांधकाम करण्यास या दोन उड्डाणपुलांचा अडथळा येत असल्यामुळे PMRDA ने सदर आदेश दिले आहेत. दोन्ही पूल पाडण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी देण्यात आलेला असून या दिवसांमध्ये हे दोन्ही उड्डाणपूल जमीनदोस्त करण्यात येणार असून त्यामुळे आसपासचा परिसर हा धोकादायक ठरू शकतो, त्यासाठी म्हणून पर्यायी रस्त्यांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे.

हे दोन उड्डाणपूल जमीनदोस्त केल्यानंतर तिथे दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्याचा सरकारी खर्चाचा अंदाज हा जवळ जवळ २५० कोटी रुपये इतका आहे. या उड्डाणपुलांचा कंत्राटदार टाटा आणि सीमेन्स असणार आहेत. दरम्यान मेट्रो बांधकामासाठी मजुरांची संख्या भेडसावत आहे. लॉकडाऊन मध्ये हजारो मजूर त्यांच्या राज्यात परतल्या नंतर मेट्रो कामे करण्यासाठी मजूर मिळत नाहीत, आता याचं कारणामुळे मेट्रो प्राधिकरण परराज्यात बसेस पाठवून,त्या त्या राज्यातील सरकारला विनंती अर्ज लिहून मजुरांना परत बोलावण्यासाठी आटापिटा करत आहेत. महाराष्ट्रातील मजूर या ठिकाणी का वापरण्यात येत नाहीत असा प्रश्न स्थानिक लोक विचारत आहेत.