जिल्हाध्यक्ष नवल किशोर राम यांनी पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थी, परराज्यातील व महाराष्ट्रातील मजूर तसेच पर्यटक यांच्या स्थलांतरासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
“आंतरराज्यामध्ये विमानसेवा सुरू झाली असून, आंतरराष्ट्रीय विमानसेवा ही अडकलेल्या परदेशी नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका अधिकाधिक बळावत चालला आहे. त्यासाठीच प्रशासकीय यंत्रणा अधिक कडक बनवणे हे आवश्यक आहे.”, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याद्वारे खालील प्रमाणे अधिकारी नेमणूक व त्यांची विशेष कार्ये याची सूची आहे:
(१) उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे (मो. क्र. 9423043030) आणि हिंमत खराडे ( मो.क्र. 9422072572)
जबाबदारी:
पुणे जिल्ह्यामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या संबंधित नोडल अधिकारी यांच्याकडून यादी प्राप्त करून घेणे, तसेच संबंधित कामगारांचे स्क्रिनिंग झाल्याबाबतची खात्री करणे. तसेच त्या संबंधित राज्याकडून परवानगी घेणे, परवानगी पत्र तयार करून घेणे व त्यांना संबंधित राज्यामध्ये पाठविण्यासाठी बस, रेल्वे या बाबतची व्यवस्था करणे आदी जबाबदारी देण्यात आली आहे.
(२) उपजिल्हाधिकारी भूसंपादन, श्रीमंत पाटोळे (मो.क्र. 9075748361)
पुणे जिल्ह्यामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या संबंधित नोडल अधिकारी यांच्याकडून यादी प्राप्त करून घेणे, तसेच संबंधित कामगारांचे स्क्रिनिंग झाल्याबाबतची खात्री करणे. तसेच त्या संबंधित राज्याकडून परवानगी घेणे, परवानगी पत्र तयार करून घेणे व त्यांना संबंधित राज्यामध्ये पाठविण्यासाठी बस, रेल्वे या बाबतची व्यवस्था करणे आदी जबाबदारी देण्यात आली आहे.
(३) उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. 17 आरती भोसले
(मो.क्र. 9822332298)
जबाबदारी:
यांच्याकडे ग्रामीण हद्दीतून बाहेरच्या राज्यामध्ये जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांची यादी तयार करणे व संबंधित कामगारांना त्या-त्या राज्यामध्ये पाठविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय ठेऊन कामकाज करणे.
सदर माहिती व दूरध्वनी क्रमांक ही पुणे जिल्हा माहिती केंद्राने त्यांच्या ट्विटर वर प्रकाशित केली आहे